01:34pm | Nov 29, 2024 |
व्हिटॅमिन B12 ची कमतरता असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या रोजच्या आहारात या जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा अभाव.
आपल्याला खरंतर दररोज केवळ 2.4 मायक्रोग्रॅम्स व्हिटॅमिन B12 ची आवश्यकता असते. वाचताना हा आकडा अतिशय लहान वाटतो. पण अनेकदा ती गरजही पूर्ण होत नाही आणि मग अनेक आरोग्यविषयक समस्या सुरू होतात.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता- काय आहेत लक्षणं?
शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्याचं सर्वांत ठळक लक्षण म्हणजे प्रचंड थकवा. त्यामुळे तुमच्या रोजच्या कामांवरही परिणाम होतो.
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे न्यूरॉलॉजिकल प्रॉब्लेम निर्माण होतात. बधीरता, विस्मरण, तोल जाणं, गोंधळ अशा समस्या निर्माण होतात.
जर व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेवर वेळीच उपचार झाले नाहीत, तर या समस्यांमुळे कायमस्वरूपी शारीरिक नुकसान होऊ शकतं.
पोटाला असलेल्या अस्तरातून B12 शोषून घेण्यासाठी दोन इन्झाइम्स स्रवतात. त्यापैकी एक अन्न आणि B12 वेगळं करतं आणि ते व्हिटॅमिन लाळेतील R प्रोटीनसोबत मिसळायला मदत करतं.
दुसऱ्या इन्झाइममुळे हे व्हिटॅमिन B12 शरीरात शोषलं जातं.
या व्हिटॅमिन B12 शरीरात शोषले जाण्याचे दोन प्रमुख टप्पे आहेत. यामध्ये इतर अनेक छोट्याछोट्या पायऱ्या असतात आणि इथेच कोठेतरी व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता का निर्माण होते?
जर पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नसेल तर व्हिटॅमिन B12 हे R प्रोटीनसोबत मिसळत नाही. त्यामुळे शरीराची B12 शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
अनेकदा वेगवेगळ्या औषधांमुळे आपलं तोंड कोरडं पडतं, पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नाही. ब्लड प्रेशरवरील औषधं तसंच नैराश्यावर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं यांमुळे अनेकदा तोंड कोरडं पडतं.
पोटामध्ये जर कमी प्रमाणात अॅसिड स्रवत असेल तरी B12 ची कमतरता निर्माण होते. पोटाच्या अल्सरवर उपचारासाठी जी औषधं वापरली जातात, त्यामुळे अॅसिड स्रवण्याचं प्रमाण कमी होतं. व्हिटॅमिन B12 ची कमतरता आणि अल्सरच्या गोळ्यांमध्ये संबंध असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे.
गॅस्ट्रिक सर्जरी, जुनाट सूज, दीर्घकाळ असलेला अॅनिमिया, थकवा अशा कारणांमुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. स्वादुपिंडात बिघाड हेही व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं प्रमुख कारण असतं.
टाइप 2 डायबेटिसमध्ये उपचारासाठी वापरलं जाणारं मेटफॉर्मिन B12 कमतरतेसाठी कारणीभूत ठरतं.
कंपलीट ब्लड काउंट (CBC) आणि मेटॅबॉलिक पॅनेलसारख्या टेस्टमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे की नाही हे पाहिलं जात नाही.
त्यामुळे जर तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यासारखी लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यासंबंधीची चाचणी तातडीने करून घ्यायला हवी.
त्यानंतर शरीरात B12 ची किती कमतरता आहे, त्यानुसार पुढच्या उपचारांची दिशा ठरते. जर B12 अत्यंत कमी झालं असेल, तर तुम्हाला ती कमतरता पूर्ण भरून काढण्यासाठी तुम्हाला किमान वर्ष लागू शकतं. अर्थात, त्यासाठी योग्य उपचार घ्यावे लागतात.
B12 च्या कमतरतेसाठी मुख्यतः गोळ्या दिल्या जातात. पण जर तीव्रता अधिक असेल तर इंजेक्शनही दिले जातात. डॉक्टर त्यासाठी आवश्यक सल्ला देतात.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |