12:48pm | Sep 02, 2024 |
मुंबई : मालवण येथील राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला होता. हा पुतळा २६ ऑगस्ट रोजी पडला. त्यानंतर या पुतळ्याची निर्मिती करणारे शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चेतन आपटे याला अटकही झाली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. परंतु जयदीप आपटे अजूनही फरार आहे. पोलिसांची सात पथके त्याचा शोध घेत आहेत. परंतु पोलिसांना त्याचा थागंपत्ता लागत नाही. दुसरीकडे त्याचे कुटुंब ठाणे येथील घरी परतले आहे. ते सध्या पोलिसांच्या नजरकैदेत आहे. त्यांचीही सिंधुदुर्ग आणि कल्याण पोलिसांच्या पथकाने चौकशी केली.
मालवण राजकोट किल्ल्यावरील 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला होता. यानंतर गुन्हा दाखल होताच शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे. त्याचे कुटुंब पोलिसांच्या नजर कैदेत आहे. सलग पाचव्या दिवशी देखील जयदीप आपटे यांच्या घराबाहेर पोलिसांच्या मोठा बंदोबस्त आहे. जयदीप फरार होताच त्याची पत्नी आणि त्याची आई आपल्या मुलीसह शहापूरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग गुन्हे शाखा त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस आणि कल्याण क्राईम ब्रँचकडून त्यांचीही चौकशी सुरु झाली. त्यानंतर गुरुवारी त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सोडण्यात आले.
जयदीप आपटे याचे घर बंद असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्याच्या घराबाहेर अंडी फेकून आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून जयदीप आपटेचे कुटुंब पोलिसांच्या नजर कैदेत आहे.
या प्रकरणात फरार शिल्पकार जयदीप आपटेचा शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली आहे. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहे. परंतु अजूनही आपटे सापडला नाही.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |