सातारा : पुसेगाव तालुका खटाव येथील जनावरांच्या बाजारामध्ये प्राणी संरक्षण कायदेचे उल्लंघन करून बैल कत्तलीसाठी विकले जातात. ही बाब अत्यंत गंभीर असून एक जून 2024 राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे टॅगिंग असल्याशिवाय पशुधनाचे खरेदी विक्री करता येणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी पुसेगावचे यात्रेत व्हावी अन्यथा आम्ही यात्रेदरम्यान उपोषण करू, असा इशारा अखिल भारतीय कृषी व सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मानद पशु कल्याण अधिकारी माधव धुमाळ, एड. दत्तात्रय सणस , गोशाळा व्यवस्थापक वैभव सणस इत्यादी यावेळी उपस्थित होते.
एकबोटे म्हणाले, पुसेगाव येथील बाजारामध्ये कोणत्याही टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी विक्री होते. पुसेगावनगरीला एक वेगळी आध्यात्मिक प्रतिष्ठान लाभले आहे. येथील गोधनाला जिओ टॅगिंग करावे एक जून 2024 रोजी राज्य शासनाने विशेष आदेश काढून जिओ टॅगिंग आदेश पशुधन खरेदी विक्रीमध्ये बंधनकारक केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुसेगावच्या यात्रेत केली जावी. यात्रा समितीने कसाही व त्यांच्या हस्तक यांना संपूर्णपणे प्रवेश बंदी जाहीर करावी व येथील बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलीस पथक नेमावे,अशी मागणी त्यांनी केली.
या यात्रेमध्ये कसाई यांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असते मात्र प्रशासन यांच्यावर कोणतेही कारवाई करत नाही .गोरक्षकांनी गतवर्षीच्या यात्रेत पशुधन वाचण्याचा प्रयत्न केला मात्र पुसेगाव पोलिसांचे त्यांना सहकार्य मिळाले नाही. टॅगिंग असणाऱ्या जनावरांच्या खरेदी विक्रीबाबत यात्रेत योग्य कायदेशीर निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर हा जनावरांचा बाजार तत्काळ रद्द करावा व महाराष्ट्रातील गोरक्षक पुसेगाव मध्ये यात्रेच्या कालावधीत तीव्र आंदोलन करतील, असा इशारा मिलिंद एकबोटे यांनी दिला आहे.