सातारा : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे 14 ते 16 जानेवारी या कालावधीत येथील पोलीस कवायत मैदान, सातारा येथे आयोजन करण्यात आले असून या बाल महोत्सवाचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे.
या बालमहोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेता ठरलेल्या विजयी व उपविजयी संघाना शिल्ड, ट्रॉफी, स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना प्रशिस्तपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास तहसीलदार समीर यादव, जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर हे मान्यवर उपस्थित राहून स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 16 जानेवारी रोजी असून याच दिवशी बाल महोत्सवाचा समारोपही होणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.