सातारा : जावळीचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांनी आज नवी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. अनेकांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.
यावेळी आण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मेढयाच्या नगराध्यक्षा रूपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, भाजपा तालुकाध्यक्ष मारूती चिकणे, सभापती जयदीप शिंदे, भाजपाचे युवा अध्यक्ष सागर धनावडे, जावळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी, संचालक विजय सावले, आनंदराव सपकाळ, हणमंत शिंगटे, बाबाराजे प्रतिष्टानचे अध्यक्ष ज्ञानदेव दळवी, उपाध्यक्ष संदीप शेलार उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सदाभाऊ सपकाळ यांच स्वागत करून सर्वोतपरी सहकार्य करू, असे स्पष्ट करून सर्वांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करून पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले.
माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांनी सांगितले की, सर्व कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आपल्या जावळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, बोंडारवाडी धरणासह जावळीच्या विकासासाठी प्रवेश भाऊंचा झाला असून आता राम-लक्ष्मण आम्ही एकत्र आलो आहोत. यावेळी संजीव नाईक , नरेंद्र पाटील, ज्ञानदेव रांजणे, कविता धनावडे अरुणा शिर्के यांची भाषणे झाली.