सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलेंडर’ हे निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने सातारा पूर्व जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार तात्पुरते चिन्ह आरक्षित करण्याची मागणी करत ‘गॅस सिलेंडर’, ‘कप-बशी’ व ‘बॅट’ ही तीन मुक्त चिन्हे प्राधान्यक्रमानुसार सुचविण्यात आली असून, ‘गॅस सिलेंडर’ हे चिन्ह प्राधान्याने देण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमोल गंगावणे, प्रसिद्धीप्रमुख विकास चंदनशिवे, राजेंद्र ओव्हाळ उपस्थित होते .