ध्वनी प्रदूषण करणार्‍या 20 डॉल्बी चालकांच्या विरोधात गुन्हे

by Team Satara Today | published on : 19 September 2024


सातारा : सातारा शहर परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था भंग करणार्‍या 97 जणांना सातारा सह पोलिसांनी तडीपार केले होते. तसेच तडीपार आदेशाचा भंग करणार्‍या 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 20 डीजे चालकांच्या विरोधात खटले न्यायालयाकडे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील 97 गुन्हेगारांना 163 अन्वये तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीही या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार नियम 2000 चा भंग करणार्‍या 20 डॉल्बी चालकांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. हे प्रस्ताव न्यायालयाकडे खटले स्वरूपात पाठवण्यात आलेले आहेत. याशिवाय प्लाजमा बिम लाईट आणि लेझर बिम लाईटचा वापर केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, सुधीर मोरे, राहुल घाडगे, विश्वनाथ मेचकर, दीपक इंगवले, सुजित भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर निकम, गणेश जाधव यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकास सश्रम कारावास
पुढील बातमी
ट्रॅक्टर अपघातात 12 जण जखमी; चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या