सातारा : नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुदाम शामराव चव्हाण (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांचा गडकर आळी येथील दुकानगाळा पतसंस्थेने सीलबंद केलेला असताना चव्हाण यांनी कुलपांवरील सील तोडून नियमांचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.