सातारा : तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयवंत शिवदास कांबळे (रा.गुरुवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दि. 30 जून रोजी ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.