मराठा समाजातील युवकांना अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील व्याज परतावा योजनेचा लाभ

by Team Satara Today | published on : 28 October 2025


सातारा  : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणां पोहचवून त्यांना सक्षम बनविणे. योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे. हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. या महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील  11 हजाराहून अधिक युवक उद्योजक झाले आहेत. सूरज पवार यांनी महामंडळाकडील व्याज परतावा योजनेचा लाभ घेऊन कपड्याचे दुकान केले  व त्यातून आर्थिक उन्नती साधली. पवार यांनी बेरोजगार युवक-युवतींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

बेलवडे खुर्द ता. पाटण येथील युवक सूरज आत्माराम पवार यांची परिस्थिती हालाखीची. त्यांना नेहमीच आर्थिक टंचाई भासत असे. नोकरी शोधात असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची माहिती मिळाली. श्री. पवार यांनी कापड व्यवसाय करण्याचा निश्चय केला. श्री. पवार यांनी शिवदौलत सहकारी बँक शाखा मल्हार पेठ शाखेशी संपर्क साधून कागदपत्रे सादर केली. त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी महामंडळाकडून दहा लाख रुपयांचे कर्ज  मिळाले.   महामंडळाच्या माध्यमातून आज अखेर १ लाख ५२ हजार रुपयांचा व्याज परतावा मला मिळाला आहे.    श्री. पवार यांनी साकुर्डी पेठ ता. कराड येथे श्री बेलजाई कापड या नावने दुकान सुरु झाले आहे. साकुर्डी हे गाव पाच गावांची बाजारपेठ असल्यामुळे चांगल्या प्रकारे व्यवसायाची सुरुवात झाली.

युवक-युवतींनी नोकरीच्या मागे न लागता जो व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्याची संखोल माहिती घ्यावी. व्यवसायाचे प्रशिक्षण मिळत असल्यास तेही घ्यावे. नोकरीच्या शोधात असताना महामंडळाच्या माध्यमातून मी स्वत:चा कापड व्यवसाय सुरु केला आहे. यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असून आज माझ्या घराच्या गरजा मी पूर्ण करु शकत आहे ते शक्य झाले महामंडळामुळेच. तरी युवक युवकांनी नोकरीच्या शोधात आपला वेळ वाया न घालवता स्वत:चा व्यवसाय करावा सुरु करुन नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हा, असे आवाहनही सुरज पवार करतात.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत पुरुष लाभार्थ्यांकरीता कमाल 50 वर्षे व महिला लाभार्थ्यांसाठी कमाल 55 वर्षे करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एकाच कुटूंबातील (रक्त नाते संबंधातील) व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहीले असतील, तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजुरी देत आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत यापुर्वी ही योजना किमान पाच व्यक्तिंच्या गटाला किमान रू. 10 लाख ते कमाल 50 लाखाच्या मर्यादेत कर्जावरील व्याज परतावा करण्यात येत होता. या योजनेमध्ये शिथिलता आणून, दोन व्यक्तींसाठी कमाल रू 25 लाखाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी कमाल रू 35 लाखाच्या मर्यादेवर,चार व्यक्तींसाठी कमाल रू 45 लाखाच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रू 50 लाखाच्या मर्यादेवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करते.  तसेच  शेती पूरक व्यवसाय करणाऱ्यांना व महिला बचत गटाकरीता असलेली कमाल वयोमर्यादेची अट वगळण्यात आली आहे. गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत F.P.O. गटांची संख्या 20 पेक्षा जास्त असल्यास संबंधित गटाच्या संचालकाने सर्व सदस्यांच्या उत्पन्नाचे पुरावे यापूर्वी संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता नागरी सुविधा    केंद्रामधून (सीएससी) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारानुसार,  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही नागरी सुविधा केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांनी आपला स्वत:चा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी महामंडळाकडील योजनेच्या लाभासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सातारा सर्व्हे न 22 अ जुनी एम.आय.डी.सी.रोड बॉम्बे रेस्टॉरंट सातारा येथे संपर्क साधावा.

वर्षा पाटोळे

जिल्हा माहिती अधिकारी, सातारा



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार
पुढील बातमी
नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या