सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी, कोरोना काळातील मानधन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनात शेकडोच्या संख्येने सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका-सेविका संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे महासचिव ॲड. शौकतभाई पठाण, राज्याध्यक्षा सुजाता रणनवरे, जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर, संगीता शिखरे, नुरजँहा सय्यद, निर्मला मोदी, रेखा जाधव, सुरेखा शिंदे, अर्चना आहिरेकर, उषा कुंभार यांच्यासह संघटक अजय नलावडे, संदीप माने, विठ्ठल सुळे आदींसह शेकडोच्या संख्येत सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सेविका आणि मदतनीसांनी रस्त्याच्या बाजुला ठिय्या मांडला होता. यावेळी विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर महासचिव ॲड. शौकतभाई पठाण यांनी सेविका आणि मदतनीसांना मार्गदर्शन करत आंदोलनाची भूमिका सांगितली. आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मुल होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे. सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये दर करावा, अंगणवाडी सेविका व २६ हजार रुपये व मिनी अंगणवाडी मदतनिसांना २० हजार रुपये दरमहा मानधन करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्हा परिषद असा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आंदोलन केले. याठिकाणी स्वतंत्र मंडप टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले. यावेळी मागण्यांसाठी घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा गायकवाड, सरचिटणीस वनिता वाडकर आदींसह सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |