सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार अशा एकूण ९ जणांना 'पोलीस महासंचालक पदक' जाहीर झाले आहे. एकाचवेळी ९ पोलिसांना हे पदक जाहीर झाल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. दरम्यान, १ मे रोजी पदक देवून पोलिसांना सन्मानित केले जाणार आहे.
पोलीस उपअधीक्षक राहूल धस, बाळासाहेब भालचीम तर सहायक फौजदार सावता राउत या पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. पोलीस हवालदारांमध्ये अंकुश यादव, सुजीत भोसले, अजित कर्णे, संभाजी काटकर, रुपाली वाघ, शशिकांत काळे या पोलिसांना 'पोलीस महासंचालक पदक' जाहीर झाले आहे.