10:47pm | Dec 04, 2023 |
सातारा : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन महत्त्वाच्या राज्यात भाजपा ची सत्ता आल्याबद्दल जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत सातारा शहरातील मोती चौक येथे भाजपा कार्यकर्त्यांनी सातारकरांना सातारी कंदी पेढे वाटून, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम प्रतिक्रिया देताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या सरकारने राबविलेल्या विविध योजना आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकानं झालेला लाभ यामुळेच हे यश प्राप्त झाले. तीन महत्त्वाच्या राज्यात भाजप ची बहुमताची सत्ता आली आणि तेलंगणा या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आठ आमदार निवडून येवून जनाधार वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप च्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि त्यांना लाभ मिळवून देण्याचे काम अहोरात्र केले. त्यामुळे कुणीही किती वल्गना केल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कितीही नावे ठेवली तरीही हे सरकार सर्व जाती धर्मा साठी काम करत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत याबद्दल लोकांना पूर्ण खात्री आहे.
भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी धैर्यशील काम यांना पेढा भरवत अभिनंदन केले.
प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुवर्णाताई पाटील यांनी महिलांची जास्तीत जास्त मते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत. यामुळेच तीन राज्यात भाजपाची सत्ता आली, असे सांगून सर्व महिलांचे अभिनंदन केले. तसेच महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्या तळागाळात पोहचवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण (पश्चिम) मंडल अध्यक्ष महेश गाडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुवर्णाताई पाटील, सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण यावेळी उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |