विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांचा रुटमार्च

by Team Satara Today | published on : 26 October 2024


सातारा : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विविध गावांमध्ये रूट मार्च काढण्यात आला.

रुटमार्चच्या सत्रामध्ये तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडवे, मर्ढे, लिंब, पाटखळ या ठिकाणी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत याठिकाणी रुटमार्च काढण्यात आला. तसेच सायंकाळी ५ ते ७ या वेळेत देगाव व चिंचणेर या गावांमध्ये रुटमार्च काढण्यात आला.

या रुटमार्चमध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याचे ३ अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच SSB चे ४ अधिकारी व २१ जवान लाठी, शस्त्रासह सहभागी झाले होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जनजागृतीपर कार्यक्रमातून शिवथर व सालपे येथे मतदान जनजागृती
पुढील बातमी
कोरेगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी जनतेतून उठाव : आ. शशिकांत शिंदे

संबंधित बातम्या