भरधाव डंपरची दुचाकीस धडक; एक जखमी

by Team Satara Today | published on : 07 April 2025


सातारा : जावळी तालुक्यातील सरताळे गावच्या हद्दीत भरधाव डंपरची दुचाकीस धडक बसली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी समीर सुनील पिसाळ (रा. म्हसवे, ता. जावळी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार मोहित नंदकुमार बोराटे (रा. लिंब गोवे, ता. सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. 6 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सरताळे गावच्या हद्दीत अपघात झाला. तक्रारदारांचे वडील हे पाचवड येथून घरी येत होते. त्यावेळी सरताळे गावच्या हद्दीत भरधाव वेगात डंपर (एमएच, 11. डीडी, 7276) येत होता. या डंपरची दुचाकीला समोरुन धडक बसली. यामध्ये तक्रारदारांचे वडील सुनील धर्मू पिसाळ यांच्या डोक्यास मार लागून रक्तस्त्राव झाला. तसेच हात आणि पायालाही गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातातील जखमीचा मृत्यू
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

संबंधित बातम्या