अपघातातील जखमीचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 19 December 2024


सातारा : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा ते ठोसेघर रस्त्यावरील बोरणे गावच्या हद्दीत दुचाकीवरुन घसरुन झालेल्या अपघातात जखमी झालेल्या सुनील बाळू राठोड (वय 21, रा. सर्जापूर ता.जावली) या युवकाचा उपचारावेळी मृत्यू झाला. ही घटना 16 डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी
पुढील बातमी
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी

संबंधित बातम्या