सातारा : वर्ये, ता. सातारा येथे शाब्दिक वादावादीनंतर एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी विनोद अंबरनाथ डवरी (रा. वर्ये) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश सतीश धोंडवड, अभिजित विष्णू जाधव (दोघेही रा. सोनगाव, ता. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. 3 फेब्रुवरी रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास वर्येतील एका चायनीज गाड्यासमोर हा प्रकार घडला. चायनीज गाड्यावरील कामगाराशी शाब्दिक वाद झाल्याच्या कारणावरुन संशयितांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन शिवीगाळ आणि दमदाटी केली. अधिक तपास पो. हवा. कुमठेकर करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा