सातारा : विकासनगर, सारा येथे चौथ्या मजल्यावरुन पडल्याने मंगर चेतो तुरी (वय ४९, रा. झारखंड सध्या रा.विकासनगर, सातारा) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १८ सप्टेबर रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विकासनगर येथे बिल्डींगचे काम सुरु आहे. मंगर हे कामगार असून दि. १७ सप्टेबर रोजी झोपण्यासाठी बिल्डींगमध्ये वर गेले होते. मात्र, ते मध्यरात्री किंवा पहाटे खाली पडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही बाब सकाळी समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस ठाण्यात या झाली ची नोंदअसून पोलिस तपास करत आहेत.