सातारा : गणपती बनवण्याच्या कारखान्यातील पोत्यांची थप्पी अंगावर पडून मुलगा जखमी झाल्याची घटना दि. 27 रोजी घडली.
राधिका रस्त्यातील संजय पोतदार यांच्या गणपती बनवण्याच्या कारखान्यामध्ये सचिन मोरे हा काम करत होता. तेथे कोणत्याही सुरक्षिततेची काळजी न घेता पोत्यांची थापी लावली होती. मुलगा सचिन हा काम करत असताना पोत्यांची थापी त्याच्या अंगावर पडून तो जखमी झाला. या प्रकरणी आशा भानुदास मोरे (वय 58, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पोतदार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.