सातारा : गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास भिक्षेकरी गृह येथील गेट समोर असणारे रस्त्यावर सुधीर मोहन जाधव रा. करंजे, सातारा यांच्या गाडीस अरविंद रामराव कदम रा. कदम बाग, सातारा यांनी त्यांची गाडी क्र. एमएच 15 डीसी 5697 ने अचानक यू टर्न घेतला. त्यामुळे जाधव यांच्या गाडीच्या उजव्या बाजूला धडक बसली. त्यात जाधव यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजगे करीत आहेत.