पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

बहारदार शास्त्रीय रागदारी आणि सुरेख अभंगवाणीने मोहरली सज्जनगडावरील संध्याकाळ

by Team Satara Today | published on : 19 November 2024


सातारा : स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि आज  संपूर्ण देशात अतिशय बहारदार गायन सादर करणारे शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक पंडित जयतीर्थ  मेऊंडी यांनी सादर केलेल्या बहारदार पहाडी शास्त्रीय गायनाने आणि तितक्याच सुरेख आळविलेल्या अभंगांनी सज्जनगड येथील संध्याकाळच्या सत्रातील गायन संध्या अतिशय सुरेख अभंग वाणीने मोहरली.  

सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अमृत महोत्सवीय सोहळा आणि विष्णू पंचायतन यागाचे औचित्य साधून कर्नाटकातील धारवाड-हुबळी येथील पं. जयतीर्थ  मेऊंडी  यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंडितजींनी आजवर संपूर्ण देशात आणि प्रदेशात हजारो मैफिली रंगविल्या एक अशीच अविस्मरणीय अशी ही गायनाची मैफल सज्जनगडावर सादर करताना त्यांनी अनवट अशा शिवमल्हार रागातील.. मन मंदिर झगमगाए..राम अवध पुरी लौट आए.. अतिशय सुरेख सादर करत शिव अभोगी रागातील ..रुप तुझे देवा,दाखवी केशवा. ..आळवताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

रामाचे भजन तेची माझे ध्यान... स्वतःच रचलेली रचना अकार, उकार, मकार, करी देहा विचार..परी विठ्ठल अपरंपार.. सादर करताना त्यांनी आपल्या गायन साधनेची ओळखच उपस्थितांना करून दिली. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. सादर झाल्यावर.. रंग ना डालो शामजी ..बाजे मुरलिया ..भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ..आणि तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल म्हणत पंडितजींनी तब्बल अडीच तास रंगवलेली मैफल अक्षरशा  उपस्थितांना   मंत्रमुग्ध करून सोडणारी ठरली.

पंडितजींना यावेळी गायनासाठी सहसा त्यांचेच विद्याविभूषित चिरंजीव ललित  मेऊंडी  यांनी  केली.   तबला साथ अतिशय सुरेखपणे पांडुरंगदादा पवार यांची होती, तर पखवाजावर शुभम उगले यांनीही बहारदार वादन केले. टाळा च्या साथीला विश्वास कळमकर होते. संवादिनीवर मेंगलोर येथील सुप्रसिद्ध वादक नरेंद्र नायक यांनी अतिशय लीलया पंडितजींना साथ केली. या कार्यक्रमाचे निवेदन अभय नलगे यांनी अतिशय बहारदारपणे केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ भक्त पंडित अजय बुवा रामदासी यांनी केल्यावर कार्यक्रमाची सांगता सर्व मान्यवर कलाकारांचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने विलासराव ताम्हणकर यांच्या हस्ते श्री राम मंदिराची प्रतिकृती रामनामी, प्रसाद देऊन करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'सिटाडेल: हनी बनी' सीरीजने वरुण अन् समांथाला केलं मालामाल
पुढील बातमी
केरळ राज्यातील कोल्लम येथे पहिले ऑनलाईन कोर्ट सुरु

संबंधित बातम्या