चाफळ : रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला स्फोटक पदार्थ चरावयास सोडलेल्या गाभण खिल्लार गायीच्या तोंडात आला. जबड्यामध्ये चार्याचा घास चावताना त्या स्फोटकाचा स्फोट होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना मालकाच्या समोर माजगाव ता.पाटण येथील वन विभाग हद्दीलगत असणार्या परीटकी शिवारात घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, माजगाव येथील शेतकरी सुरेश गुलाब कदम हे नेहमीप्रमाणे आपली पाळीव जनावरे चरावयास वनविभागालगत असणार्या परीटकी नावाच्या शिवारातील पडीक जमिनीवर गेले होते. अचानक स्फोट झाल्याचा आवाज ऐकू येऊन त्यांच्या समोरच त्यांच्या गायीचे तोंड छिन्नविच्छिन्न झाल्याचे त्यांनी पाहिले. सदरची घटना कदम यांनी आपल्या गावातील लोकांना फोन करून सांगितली. तसेच पोलीस व वन विभागालाही याची माहिती देण्यात आली.
दुसर्या दिवशी सकाळी पशुधन विकास अधिकारी डॉ.सुचिता माळी, चाफळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल घाडगे यांनी गायीचे जागेवर शवविच्छेदन करून कोणतातरी स्फोटक पदार्थ खाल्ल्याने गायीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, पी. सी.साळवी यांनी येऊन परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला असून पुढील अधिक तपास सुरु आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |