सातारा : सातारा तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास वडूथ तालुका सातारा येथील महिला राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेल्या आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, गोगावलेवाडी, पोस्ट मोरावळे, ता. सातारा येथील एक महिला राहत्या घरातून निघून गेल्या आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.