सातारा : खोटा ई-मेल करुन लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी अज्ञाता विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरडीएक्स ठेवल्याचा खोटा ई-मेल करुन लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अज्ञाता विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस सागर निकम यांनी तक्रार दिली आहे.