सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार तळे येथे दोघांनी दुचाकीच्या चैनीने व केबलने मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश निपाणी व मनोज निपाणी (दोघे रा. मंगळवार तळे परिसर, सातारा) यांच्या विरुध्द आनंद हिरो पवार (वय 28, रा. म्हसवे ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 1 डिसेंबर रोजी घडली आहे. शेतमालकाला उलटे बोलल्याच्या कारणातून ही मारहाण झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.