सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील कृष्णा टॉकीज च्या परिसरात सलीम जैनुद्दीन शेख रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा हे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 770 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.