सातारा : तासगाव ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव ता.सातारा येथून दुचाकी चोरी झाल्या प्रकरणी शंकर बबन पाटोळे (वय 39, रा. तासगाव) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एमएच 11 सीएन 6460 या क्रमांकाची दुचाकी चोरी झाली असून ही घटना दि. 20 नोव्हेबर रोजी घडली आहे.