सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोडोली, सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यू घ्या समोरील मोकळ्या जागेत योगेश विलास काळंगे (वय 44, रा. शुक्रवार पेठ सातारा), श्रीधर अनिल निकम (वय 32 रा. अमरलक्ष्मी देगाव रोड सातारा), ज्ञानेश्वर विलास मोरे (वय 38 रा. बोरखळ, ता. सातारा) आणि धनंजय वामन अनपट (वय 38, रा. अनपटवाडी, ता. कोरेगाव) हे चौघे दारू पिऊन पोलिसांच्या समक्ष एकमेकांशी भांडण करताना आणि आरडाओरडा करताना आढळून आले. संबंधितांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार अवघडे करीत आहेत.