जुना मोटर स्टँड परिसरातून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 08 November 2024


सातारा : जुना मोटर स्टँड परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुना मोटर स्टँड येथील अप्सरा बार येथील मोकळ्या जागेत लावलेली दुचाकी (एमएच 11 बीएन 2327) अज्ञाताने दि. 19 सप्टेंबरनंतर चोरुन नेली. याबाबत सुधाकर जयसिंग सपकाळ (वय 40, मूळ रा. केळेवाडी, ता. पाटण, सध्या रा. मुंबई) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार सणस तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वृध्देचे सव्वालाखांचे सोने लुटले
पुढील बातमी
सुनील टिंगरेकडून पोर्शे कार अपघात प्रकरणी शरद पवार यांना नोटीस

संबंधित बातम्या