08:53pm | Apr 10, 2024 |
सातारा : नायट्रेट सल्फर या स्फोटक पदार्थांच्या चाळीस कांड्या धोकादायक पद्धतीने वाहतूक करून त्याच्या विक्रीचा प्रयत्न करणार्या एकाला रायगाव फाटा, ता. जावली येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून स्फोटक पदार्थाच्या चाळीस कांड्या आणि ह्युंडाई क्रेटा गाडी असा 21 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे आणि स्फोटक पदार्थ जवळ बाळगणार्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत ह्युंडाई क्रेटा गाडीतून सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रायगाव फाटा येथे एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तेथे सापळा रचला. यावेळी पोपट नाना बिचुकले वय 29, रा. हनुमंतवाडी, आदर्की खुर्द, ता. फलटण, जि. सातारा हा इसम गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या गाडीत नायट्रेट सल्फर या स्फोटक पदार्थाच्या 40 कांड्या आढळून आल्या. ह्युंडाई क्रेटा गाडी आणि स्फोटक पदार्थ असा 21 लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, पृथ्वीराज ताटे, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने यांनी सहभाग घेतला होता. या पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |