सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर सह तालुक्यातील चार जणांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी शेंद्रे हद्दीत संतोष कृष्णा जाधव राहणार शेंद्रे तालुका सातारा यांच्याकडून 950 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईत, आरळे, ता. सातारा गावच्या हद्दीतून तेथीलच तानाजी रामचंद्र पवार यांच्याकडून 670 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
तिसऱ्या कारवाईत, आरळे हद्दीतूनच शंकर निवृत्ती कांबळे रा. पाटखळ, ता. सातारा यांच्याकडून 720 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
चौथ्या कारवाईत सातारा शहरातील जुना मोठा स्टॅन्ड परिसरातून सुमित राजेंद्र गुप्ते रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा याच्याकडून 970 रुपये रोख व जुगाराचे साहित्य करण्यात आले आहे.