राजधानी साताराने अनुभवला शिवकाल

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जोरदार मिरवणूक

by Team Satara Today | published on : 09 June 2025


सातारा : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सातारा नगरीने साक्षात शिवकाल अनुभवला. छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा मिरवणूक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. फटाक्यांची आतषबाजी, पारंपारिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके या निमित्ताने सातारकरांनी शिवकाळ अनुभवला.

शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या मिरवणूक सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता उत्सव समितीचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत शिवप्रतिमा ठेवण्यात आली होती. या शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक सोहळ्याचा प्रारंभ झाला. गांधी मैदान येथून सुरू झालेला हा सोहळा मोती चौक, गुरुवार परज, पाचशे एक पाटी, कमानी हौद, राजपथावरून पुन्हा राजवाड्याकडे मार्गस्थ झाला. ढोल ताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, घोड्यावर स्वार झालेले बाल मावळे, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके या निमित्ताने शिव मिरवणुकीचा साक्षात्कार सातारकरांना झाला.

मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांनी राजपथावर गर्दी केली होती. पालिका व पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे हा सोहळा शांततेत पार पाडला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोनाक्षी सिन्हाची तब्येत बिघडली
पुढील बातमी
अखिल भारतीय साहित्य संमेलनास सर्वतोपरी सहकार्य

संबंधित बातम्या