12:48pm | Sep 26, 2022 |
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात याबद्दल भाष्य केले होते. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा प्रचंड आक्रमक झाला आहे. त्यांच्याकडून तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
तानाजी सावंत यांनी मराठ्यांनी ओबीसी आरक्षण बाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? जर तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.
आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही आहोत. 'मराठ्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण' ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नये. अन् तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल? सत्तेची हवा एवढी पण डोक्यात जाऊ देऊ नका. आणि हो 'एस सी' मधून आरक्षण द्या अशी भूमिका मराठा समाजाने कधीच घेतली नव्हती आणि भविष्यातही कधी घेणारही नाही. त्यामुळे असले काही बोलून पत घालवून घेऊ नका, असे योगेश केदार यांनी म्हटले.
तुम्ही मूळ पक्ष सोडून जेंव्हा गुवाहाटीला पळून गेले तेंव्हा हाच सर्वसामान्य मराठा तुमच्या बाजूने उभा होता. म्हणून तुम्ही परत आल्यावर सुखासुखी नवीन सरकार स्थापन करू शकला. आजही तुम्ही सभा घेऊ शकत आहात. जर गाव गाड्यातला अन् महाराष्ट्रातला सामान्य मराठा तुमच्या विरोधात गेला असता तर तुम्हाला कुणी जगू देखील दिलं नसतं. आज शेवटचे सांगणे आहे, तुम्हाला जर एखाद्या विषयात काही माहिती नसेल तर बोलू नका. ओबीसी समाजातील नेत्यांच्या पेरलेल्या गोष्टी भाषणात बोलून मराठ्यांचा बुद्धिभेद करून समाजाचे नुकसान करू नका. ही शेवटची विनंती, असेही मराठी क्रांती मोर्चाकडून तानाजी सावंत यांना बजावण्यात आले.
आता मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यामागचा कर्ता करविता कोण आहे, हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |