डी. जी. कॉलेजमध्ये मध्ये स्टेट बँक भरतीवर मोफत कार्यशाळा

by Team Satara Today | published on : 05 January 2025


सातारा : धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०. ०० वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनिअर असोशिएट व प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती प्ररीक्षेबाबत मोफत एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

देशातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँका तसेच विविध प्रकारच्या इतर वित्तीय संस्थांमधील प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क, असिस्टंट मॅनेजर, अशोसिएट, एल.आय. सी. ऑफिसर इत्यादी पदाच्या नोकर भरतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन २०१३ पासून महाविद्यालयात बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवले जात आहे आजअखेर या केंद्रातून ६०० पेक्षा अधिक युवक-युवतींना बँकिंग क्षेत्रात आपले करिअर करता आले आहे. सद्या स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे १३७३५ ज्युनिअर असोशिएट (क्लार्क) व ६०० प्रोबेशनरी ऑफिसर्स भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच शासनाच्या देखील विविध नोकर भरती बाबतच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी परिसरातील इच्छुक युवक-युवतींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालायाद्वारे करण्यात आलेले आहे. सदर एकदिवशीय कार्यशाळा मोफत सर्व महाविद्यालयातील पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या कार्यशाळेत भरती परीक्षा, निवड प्रक्रिया व मुलखात प्रक्रिया याबाबत तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहेत सदर मोफत एकदिवशीय कार्यशाळेसाठी ऑनलाईन नोंदणी करून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. गणेश जाधव व बँकिंग केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९६८९३७१८८९ किंवा ८८८८७८०५५४ या नंबरवर वर संपर्क साधावा.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा पत्रकार भवनात साजरा होणार पहिला पत्रकार दिन
पुढील बातमी
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता

संबंधित बातम्या