सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाचा 351 वा सोहळा किल्ले रायगड येथे उत्साहात पार पाडला. सातार्यात जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या हाताच्या पंजाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्या प्रतिकृतीला उदयनराजे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या वेळी उदयनराजे भोसले यांचे समर्थक सादिक भाई शेख, अझर मनेर अरबाज शेख, हमीद शेख, आरिफ खान, अभिजीत कोळी, हाजी नदाफ मोहसीन कोरबू, सलमान शेख, मुजफ्फर सय्यद, मुशरफ शेख, असिफ नगरजी, अझर पैलवान, अकबर मुलाणी, युसुफ शेख, साहिल मुलाणी, शरीफ शेख इत्यादी मावळे उपस्थित होते.खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवरायांची सर्वधर्मसमभावाची शिकवण आजच्या युगातही सर्व पिढ्यांना प्रेरणा देणारी आहे. शिवरायांची ही शिकवण सर्वांनी मनापासून अंगीकारली पाहिजे. हीच त्यांना खरी आदरांजली आहे. मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा ही संघटना छत्रपती शिवरायांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवरायांचे आचार विचार प्रताप आणि गुण अंगी बाणवले पाहिजेत, अशी अपेक्षा सादिक भाई शेख यांनी व्यक्त केली. तिथी व तारखेचा वाद निर्माण करणे योग्य नाही. जागतिक स्तरावर शिवराज्याभिषेक दिन साजरा होण्यासाठी सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे, असे वक्तव्य अभिजीत कोळी यांनी केले. उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींच्या प्रतिकात्मक पंजाला दुग्धाभिषेक करून मानवंदना दिली. कुंडल ते रायगड पदयात्रा करणार्या अभिजीत कोळी यांचा उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026