अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना तिच्या नवीन चित्रपटाची उत्सुकता नेहमीच लागून राहिलेली असते. त्यात श्रद्धाचे हॉरर कथा असलेले चित्रपट तर चाहत्यांना आवर्जून पाहायला आवडतात. श्रद्धाच्या ‘स्त्री 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. या चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवला. अनेक आठवडे स्त्री 2 चित्रपटाचा थिएटरमध्ये धुमाकूळ पाहायला मिळाला. ‘स्त्री 2’ ने जगभरात 857 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटानंतर श्रद्धा कपूरचा आणखी एक बिग बजेट चित्रपट प्रक्षकांच्या भेटीस येणार आहे.
श्रद्धा कपूरची फॅन फॉलोईंग पाहता चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. श्रद्धा कपूर एका बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे तेही इच्छाधारी ‘नागिण’ म्हणून. ‘स्त्री 2’ चित्रपटानंतर आता श्रद्धा कपूर या चित्रपटामध्ये इच्छाधारी ‘नागिण’ची भूमिका साकारणार आहे.
निर्माता निखिल द्विवेदी आगामी ‘नागिण’ चित्रपटाची तयारी करत आहेत. या आगामी बिग बजेट चित्रपटाती श्रद्धा कपूर मूख्य भूमिकेत दिसणार आहे. निखिल द्विवेदीने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, या भूमिकेसाठी श्रद्धा कपूर त्यांची पहिली पसंत होती. श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी खूप आधीच फायनल गेलं केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं आहे.
निखिल द्विवेदी यांनी सांगितलं की या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. स्क्रिप्ट पूर्ण होण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. तीन वर्षात त्या स्क्रिप्टमध्ये अनेक बदलही करण्यात आले, मात्र अखेर ही स्क्रिप्ट पूर्ण झाली असून लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे.
तसेच त्यांनी असंही म्हटलं की, ‘हा पूर्णपणे नवीन विषय आहे, ज्याचा जुन्या चित्रपटाशी किंवा मालिकेशी कोणताही संबंध नाही. भारतीय लोककथा खूप समृद्ध आहेत आणि त्यातून अनेक नवनवीन कल्पनाही येतात म्हणून या विषयावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला” असं मत त्यांनी व्यक्त केलं
दरम्यान श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ चित्रपटातील भूमिका पाहाता या आगामी चित्रपटात ‘नागिण’च्या भूमिकेत तिला पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसेच या चित्रपटाची उत्सुकताही नक्कीच प्रेक्षकांना असणार आहे. शिवाय श्रद्धा तिच्या भूमिकांना पूर्णपणे न्याय देत असल्याचेही तिचे चाहते नेहमी म्हणतात. त्यामुळे श्रद्धाची भूमिका आणि या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतील का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |