सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऑक्टोबर 2025 ते मार्च 2025 या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी सातारा शहरालगतच्या राकेश चंद्रकांत कदम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सावजी तपास करत आहेत.