09:38pm | Apr 10, 2024 |
फलटण : ‘सातारा टुडे’च्या वस्तुनिष्ठ वार्तांकनानंतर राजुरी, ता.फलटण येथे एकावर केलेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी दीड महिन्यानंतर पाचही आरोपीना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरी गावाच्या राजुरी चौफुला परीसरात युवा उद्योजक विनोद सांगळे यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने पाचजणांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद होवून 45 दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट होते. तसेच खुलेआमपणे परीसरात वावरत होते. धमकावणे, खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण हत्याराने मारहाण, जिवे मारण्याचा प्रयत्न आदींसह आरोपींवर यापूर्वीही 326, 354 यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. डोक्यावर हातावर लोखंडी रॉडने, तलवारी ने मारहाण करून डोके व हात फ्रॅक्चर केले होते. फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण 14 कलमान्वये हा गुन्हा दाखल आहे.
विनोद सांगळे यांनी 26 फेब्रुवारी रोजी फलटण ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, असे असूनही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते. या गंभीर गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेता दिड महिना होऊनही आरोपी मोकाट याबाबत ‘सातारा टूडे’ने वस्तुनिष्ठ वार्तांकन करुन फलटण ग्रामीण पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
याचाच परिपाक म्हणून या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानदेव आंनदा गावडे, मधूकर आंनदा गावडे, पंकज ज्ञानदेव गावडे, प्रथमेश ज्ञानदेव गावडे व ओंकार संपत सांगळे यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने या पाचही जणांना चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक तपास करत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |