सातारा : वृद्धाची सुमारे पाऊण लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संपत मारुती कांबळे रा. गोंदेमाळ, मेढा, ता. जावली, जि. सातारा. सध्या रा. मुंबई हे वर्ये बाजू कडून सैदापूर बाजूकडे पायी चालत येत असताना सैदापूर फाट्यावर दोन अनोळखी लोकांनी त्यांना अडवून आम्ही दोघे पोलीस आहोत, अशी बतावणी करून कांबळे यांच्याकडील दीड तोळे वजनाचे 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.