सातारा : बांधकामावरील साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड ता. सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी बांधकामावरील साहित्याची चोरी केली. याप्रकरणी सागर आनंदराव शिंदे (वय 38, रा. पिरवाडी, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 18 नोव्हेबर रोजी ही चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी खेड येथील साईटवरुन लोखंडी बार, लाकडी प्लाय, लोखंडी नट बोल्ट असे एकूण 49100 रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले आहे.