सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 17 April 2025


सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री साडेनऊ वाजता सदर बाजार मधील शिंदे सरकार हॉटेल समोर शामराव दत्तात्रय गायकवाड अजित दत्तात्रय गायकवाड (दोघेही रा. कोंडवे, ता. सातारा), गणेश नागेश कदम (रा. करंजे पेठ सातारा), विराज राजू यादव, विशाल राजू यादव (दोघेही रा. सदर बाजार सातारा) सुशांत शिवाजी तुपे (रा. कामाठीपुरा) सातारा आणि रवींद्र उर्फ संदीप अर्जुन तुपे (रा. सदर बाजार सातारा) हे आपापसात मारामारी, भांडणे करताना आढळून आले. त्यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मद्याचे सेवन केल्याप्रकरणी बस वाहकावर गुन्हा
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या