लोणंद : नवीन पालखी मार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर लोणंद कचरा डेपो परिसरात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास भरधाव महिंद्रा बोलेरो जीप उलटून, चालक जागीच ठार झाला, तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
फलटण तालुक्यातील मिरडे येथून गुळुंचेजवळील झिरपवाडी येथील बोल्हाईदेवी दर्शनासाठी भाविकांना घेऊन, निघालेल्या भरधाव बोलेरो जीप (एमएच-42-एएस-7228) वरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ही जीप उलटून, चालक संतोष शिवाजी थोरात (वय 36, रा. मिरडे, ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जीपमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. या अपघातामुळे वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.