नटराज मंदिरात महाभिषेक सोहळ्याचे आयोजन

by Team Satara Today | published on : 15 October 2024


सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात दरवर्षी श्री नटराज देव आणि शिवकाम सुंदरी देवीस एकूण सहा विशेष महाअभिषेक करण्यात येतात विशेषण नक्षत्राच्या मुहूर्तावर या महाभिषेकाच्या वेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील दोन्ही पंचधातूच्या मूर्ती गाभाऱ्या पुढील प्रांगणात आणून या देव देवींच्या मूर्तीला विशेष अभिषेक संपन्न केला जातो. 

यामध्ये दूध ,दही, मध, साखर,भस्म, चंदन पावडर तसेच विविध फळांचे काप घालून हा अभिषेक संपन्न केला जातो. त्यानंतर या देव,देवीच्या मूर्तींना विशेष फुलांच्या हारांचा शृंगार करून या मूर्ती पुन्हा गर्भगृहात स्थापन केल्या जातात. असाच हा या वर्षीचा योग बुधवार दि.16 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे. दुपारी चार ते आठ या वेळेत हा महाभिषेक नटराज मंदिरात संपन्न होत असून, या अभिषेक सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. 

अशी माहिती नटराज मंदिराचे व्यवस्थापन समितीचे प्रमुख व व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी दिली असून, या सोहळ्यात सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच तन-धन मन अर्पून या सेवा कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या एक रक्क्मी परतावा योजना लाभ घ्यावा
पुढील बातमी
किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत प्रशिक्षण घेण्याचे आवाहन

संबंधित बातम्या