जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

by Team Satara Today | published on : 03 July 2025


दहिवडी : दहिवडी पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडून एकूण 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिवडी ते फलटण रस्त्यावरील एच.पी. पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जनावरे घेऊन निघालेला ट्रक दहिवडी पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये 5 लाख 40 हजार रुपये किमतीचे 18 मोठे रेडे व म्हैस ही जनावरे आढळून आली.

या जनावरांची विनापरवाना वाहतूक करुन ती कत्तलीसाठी नेण्यात येत होती. त्यामुळे ही जनावरे व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकचा चालक जमीर आब्बास सवार (वय 43 वर्षे) तसेच राज आसिफ पटेल (दोघेही रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस हवालदार बी. एस. खांडेकर करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण पुन्हा एकदा गूढ आवाजाने हादरले
पुढील बातमी
साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चा

संबंधित बातम्या