भाजपचे जिल्हा कार्यालय लोकाभिमुख व्हावे

 सदर बाजार मधील नूतन कार्यालयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

by Team Satara Today | published on : 09 August 2024


सातारा : भारतीय जनता पक्ष हा सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने वाढलेला पक्ष असून नंबर वन पक्ष आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविणे याकरिता भारतीय जनता पार्टीच्या नूतन कार्यालयाचा उपयोग होणार आहे. खऱ्या अर्थाने हे कार्यालय लोकाभिमुख व्हावे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केली.

सातारा शहरातील कोयना सोसायटीच्या कार्यक्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 42 गुंठ्याच्या नूतन कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रदेश कार्यकारणी विक्रम पावसकर, कार्यकारणी सदस्य भरतनाना पाटील, माजी आमदार मदन भोसले, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, भारतीय जनता युवा मोर्चाचे निलेश नलवडे, चिन्मय कुलकर्णी, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, सुनेशा शहा, सुरभीताई भोसले, इत्यादी यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यालय होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचे स्वतःच्या जागेत कार्यालय असावे यासाठी पक्षांतर्गत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. आज सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे हा योगायोग चांगला आहे. तसेच कार्यालयाचा अत्यंत चांगला आराखडा सुद्धा बनवण्यात आलेला आहे. हे जनतेचे कार्यालय जनतेसाठी असावे येथे नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जावेत याकरता हे कार्यालय अत्यंत लोकाभिमुख असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ही हक्काची जागा आहे, सातारा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे काम प्रचंड वाढले असून तो नंबर एकचा पक्ष आहे. महायुती सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या संपूर्ण जागा जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ज्या पद्धतीने आपण सर्वजण भूमिपूजन कार्यक्रमासाठी एकत्र आलो आहोत त्याच पद्धतीने कार्यालयाचे बांधकाम झाल्यानंतर उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्र येणार आहोत. यावेळी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणारे आप्पासाहेब माने व वास्तु विशारद सुमित देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी फडणवीस यांच्या हस्ते भाजप कार्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी  भारतीय जनता पार्टीने 42 गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आभार मानत प्रास्ताविक केले आणि यापुढेही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सातारा जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष राहील यासाठी सर्व एकत्रपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरोग्य विभागाची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण
पुढील बातमी
बाजार समितीच्या प्रशस्त संकुलाला राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करणार

संबंधित बातम्या