बारामती : ऊर्जेची मागणी व वापर हे प्रगतीचे सूचक मानले जाते. गेल्या पाच महिन्यात अर्थात दि.1 एप्रिल 2025 पासून दि.20 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या कालावधीत महावितरणकडून बारामती परिमंडळात विविध वर्गवारीत 25 हजार 475 लघुदाब ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक 20 हजार 421 घरगुती वीजजोडण्यांचा समावेश आहे. बारामती मंडळात 5 हजार 925, सातारा मंडळात 11 हजार 186 तर सोलापूर मंडळात 8 हजार 364 लघुदाब ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
महावितरणने ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी अर्जाची प्रक्रिया महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने सोपी, सुलभ व जलद केली आहे. सेवेच्या कृतीमानकांनुसार विहित कालमर्यादेत नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार ग्राहकांना तत्परतेने वीजजोडणी दिली जात आहे. तरी ऑनलाईन सुविधेव्दारे अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करून तत्पर नवीन वीजजोडणी सेवेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
बारामती परिमंडळातील वर्गवारीनिहाय घरगुती 20 हजार 421, वाणिजिक्य 3 हजार 507, औद्योगिक 503, कृषीपंप 461, सार्वजनिक सेवा 159, पोल्ट्री व्यवसाय 129, सार्वजनिक पाणीपुरवठा 74, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन 48, शीतगृहे 9, इतर तात्पुरत्या जोडणी 164 अशा एकूण 25 हजार475 ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिलेली आहे.
बारामती मंडळातील वर्गवारीनिहाय घरगुती 4 हजार 434, वाणिजिक्य 1 हजार 51, औद्योगिक 142, कृषीपंप 146, सार्वजनिक सेवा 25, पोल्ट्री व्यवसाय 73, सार्वजनिक पाणीपुरवठा 5, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन 16, शीतगृहे 2, इतर तात्पुरत्या जोडणी 31 अशा एकूण 5925 ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिलेली आहे.
सातारा मंडळातील वर्गवारीनिहाय घरगुती 9 हजार 32, वाणिजिक्य 1 हजार 615, औद्योगिक 179, कृषीपंप 90, सार्वजनिक सेवा 68, पोल्ट्री व्यवसाय 37, सार्वजनिक पाणीपुरवठा 53, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन 27, शीतगृहे 1, इतर तात्पुरत्या जोडणी 84 अशा एकूण 11 हजार 186 ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिलेली आहे.
सोलापूर मंडळातील वर्गवारीनिहाय घरगुती 6 हजार 955, वाणिजिक्य 841, औद्योगिक 182, कृषीपंप 225, सार्वजनिक सेवा 66, पोल्ट्री व्यवसाय 19, सार्वजनिक पाणीपुरवठा 16, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन 5, शीतगृहे 6, इतर तात्पुरत्या जोडणी 49 अशा एकूण 8 हजार 364 ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिलेली आहे.