सातारा : एसटी-पिकअप अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगत महामार्गावर एसटी व पिकअपच्या झालेल्या अपघात प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एसटी चालक शितल पाटील यांनी अमित ठोंबरे (रा.सांगली) याच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 1 एप्रिल रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.