सातारा : शहर पोलिसांनी जिल्हा परिषद चौक ते सैनिक स्कूल जाणाऱ्या रोडवर असलेल्या एका पत्र्याच्या टपरीच्या आणि बांधकामाच्या कंपाऊंडच्या आडोशाला जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून एकूण ५६० रुपये किमतीचे रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी नदीम नासिर सय्यद (वय २७ वर्ष रा. शनिवार पेठ सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद जाधव यांनी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सर्किट हाऊसनजीक जुगाराच्या अड्ड्यावर छापा; रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त
by Team Satara Today | published on : 07 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा