यवतेश्वर डोंगर पुन्हा वणव्याच्या भक्ष्यस्थानी...

by Team Satara Today | published on : 24 April 2025


सातारा : सातारा शहर परिसराला सात डोंगरांचा अतिशय सुरेख निसर्गाचा सहवास लाभला आहे. मात्र सध्या एकीकडे उन्हाची रणरण वाढत असतानाच अजिंक्यतारा, यवतेश्वर, जरंडेश्वर यासारख्या महाकाय डोंगरांवर दुपारच्या वेळी वणवे लागले जात आहेत.

काल बुधवारी दुपारी शहराच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या यवतेश्वर डोंगराला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे सातारा शहरात दिसून येत होते. या  वणव्यात शेकडो दुर्मिळ वृक्ष तसेच वनस्पती, प्राणी, कीटक यांना आपला जीव गमवावा लागला. याबाबत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मोठी खंत व्यक्त केली असून काही वेळेला पावसाळ्यानंतर हिरवे गवत चांगले उगवते या भ्रामक कल्पनेतून अनेक विध्वंसक प्रवृत्तीचे लोक हे डोंगर गवत जाळण्यासाठी पेटवून देतात. त्यामुळे आता तरी सुधारा व आपला निसर्ग वाचवा अशी हाक हे पर्यावरण प्रेमी देत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चांगलं वाचन माणसाला समृद्ध बनवते : वर्षा पाटोळे
पुढील बातमी
पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर नौदलाचं मोठं पाऊल

संबंधित बातम्या