सातारा पालिकेत पहिला अर्ज दाखल; खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक वसंत लेवे यांची प्रभाग 11 मधून अपक्ष उमेदवारी

by Team Satara Today | published on : 12 November 2025


सातारा  : खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक वसंत बबन लेवे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून आपली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग रचनेमध्ये प्रभाग फुटल्याने तसेच पारंपारिक प्रभाग असणाऱ्या क्रमांक 23 मध्ये आरक्षण पडल्याने केवळ विकास कामांच्या जोरावर वसंत लेवे यांनी प्रभाग 11 वर आपली दावेदारी सांगितली आहे.

सातारा पालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली पहिल्या दोन दिवसांमध्ये कोणीही अर्ज भरला नाही बुधवारी मात्र खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक वसंत लेवे यांनी प्रभाग 11 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी साडेबाराच्या दरम्यान आपल्या निवडक समर्थकांसह ते छत्रपती शिवाजी सभागृहात दाखल झाले.  त्यांनी आपला अर्जनिवडणूक निर्णय अधिकारी प्रांत आशिष बारकुल यांच्याकडे सादर केला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद जळक वव निवडणूक समन्वयक मोहन प्रभुणे यांच्याकडून तो अर्ज तपासण्यात आला.

सातारा पालिकेत सर्वात पहिल्यांदा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान वसंत लेवे  यांनी मिळवला. प्रभाग 11 मधून नगर विकास आघाडीचे आजी पक्षप्रतोत अविनाश कदम यांची सुद्धा तयारी सुरू आहे. लेवे यांनी भाजपच्या मुलाखत सत्रामध्ये सुद्धा भाग घेतला होता. खासदार व आमदार गटाचे दोन्ही दिग्गज नगरसेवक एकाच प्रभागातून तयारी करत असल्याने कोणा एकाला थांबावे लागणार हे उघड होते. त्यामुळे वसंत लेवे यांनी प्रभाग क्रमांक 23 आरक्षणामुळे सोडला आणि प्रत्यक्ष विकास कामे केलेल्या प्रभाग क्रमांक ११ मधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कागदपत्रे दाखल करताना अनेक विहित नमुन्यात दाखले त्यांना सादर करावे लागले याबाबत पुरेसे मार्गदर्शन प्रशासनाकडून होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

शांत मारुती वसंत लेवेंना पावणार

1996 सालापासून लेवे घराण्यातील एक तरी सदस्य सातारा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येतो. ही माझी आठवी टर्म असून गेले 35 वर्ष मी चिमणपुरा पेठेतून सातत्याने निवडून येत आहे.  यावेळी सुद्धा विजयाचा गुलाल माझाच आहे,  असा थेट दावा वसंत लेवे यांनी केला. प्रभागाच्या परंपरेप्रमाणे लेवे यांनी शांत मारुती आणि गारेंच्या गणपतीचे दर्शन घेऊन निवडक कार्यकर्त्यांसह नगरपालिका गाठली आणि तेथे प्रशासनाशी चर्चा करून आपला अर्ज दाखल केला. जेव्हा मारुती राया माझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा मला घाबरण्याचे कारण नाही चिमणपुरा पेठेतील शांत मारुती नवसाला पावतो आणि माझ्या विजयाला तोच साक्षीदार आहे अशी प्रतिक्रिया पसरलेली यांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोकूळ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक
पुढील बातमी
जागावाटप फॉर्मुल्याच्या निमित्ताने रंगणार गनिमी कावा; पक्षीय राजकारणामध्ये आघाड्यांचे अस्तित्व संपुष्टात; नगरपालिकेमध्ये बहुमताचा आकडा ठरणार महत्त्वाचा

संबंधित बातम्या